Maharashtra Assembly Elections 2019: निवडणूक चिन्ह (Electoral Symbol) हे कोणत्याही उमेदवारासाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय. निवडणूक कोणतीही असो. निवडणूक चिन्ह महत्त्वाचे. मतदारांना समजायला आणि ध्यानात राहायला सोपे असणारे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी जवळपास सर्वच उमेदवार आग्रही असतात. अशा वेळी मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत असलेले चिन्ह मिळावे असा निवडणूक आयोगाचाही प्रयत्न असतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Election) मध्येही हेच पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत राजकीय पक्षांची चिन्हे वगळून सुमारे 197 निवडणूक चिन्हं निश्चित केली आहेत. यात 'एअर कंडिशनर', 'पाव', 'गॅस' 'भाजीपाला' पेनड्राइव्ह, व्हॅक्युम क्लीनर, मोत्यांचा हार, ब्रेड टोस्टर, 'डिश अँटेना', 'संगणक माऊस', 'लॅपटॉप' 'टाइपरायटर' आणि 'ग्रामोफोन' यांसह 'सफरचंद', 'आटो रिक्षा', 'फुगा', 'बांगड्या', 'बॅट', 'जाते', 'माइक', 'पाव', 'किटली', 'भाजीपाला', 'फळे', 'संगणक साहित्य', 'झोपाळा' यासह खाद्यपदार्थाचे 'ताट' यांसह इतरही अनेक चिन्हांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांची बहूगर्दी पाहायला मिळत आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षांसोबतच इतरही अनेक उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल्याने निवडणूक चिन्ह वाटप करताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना निवडणूक चिन्ह देताना निवडणूक आयोगालाही विचारपूर्वक चिन्हवाटप करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या वेळी निवडणूक आयोगाने सुमारे 197 निवडणूक चिन्हांचा समावेश निश्चित केली आहेत. अनेकदा अनेक उमेदवार एकाच चिन्हासाठी आग्रह धरतात. अशा वेळी उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल करताना मागणी केल्यानुसार प्राधान्यक्रम ठरवत निवडणूक आयोग चिन्हवाटप करतो.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये निवडणूक आयोगाने 301 चिन्हे निश्चीत केली होती. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसाठी 7, प्रादेशिक पक्षांसाठी 64, तर अपक्ष उमेदवारांसाठी 230 निवडणूक चिन्हांचा समावेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 197 निवडणूक चिन्हे नक्की केले आहेत. हात, घड्याळ, कमळ, हत्ती, कणीस आणि विळा, हातोडा-विळा आणि तारा, पुस्तक ही निवडणूक चिन्हे राष्ट्रीय पक्ष असलेल्या अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बसप, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रीय जनता पार्टी आदी पक्षांसांठी राखीव ठेवली आहेत. तर, प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना, मनसे आदी पक्षांसाठी अनुक्रमे धनुष्यबाण आणि रेल्वे इंजिन ही चिन्हे राखून ठेवली आहेत. तर अपक्षांसाठी 197 निवडणूक चिन्हे राखून ठेवली आहेत. (हेही वाचा, मुंबई: ट्रेन खाली येऊन मृत्यू पावलेल्या भिकाऱ्याच्या नावे लाखो रुपयांच्या FD आणि नाणी; किंमत ऐकून व्हाल हैराण)
निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिलेली निवडणूक चिन्हे
निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिलेल्या चिन्हांमध्ये प्रामुख्याने पुढील निवडणूक चिन्हांचा समावेश आहे. एअर कंडिशनर, पेनड्राइव्ह, व्हॅक्युम क्लीनर, मोत्यांचा हार, ब्रेड टोस्टर, डिश अँटेना, संगणक माऊस, लॅपटॉप , टाइपरायटर , ग्रामोफोन ,सफरचंद, आटो रिक्षा, फुगा, बांगडय़ा, बॅट, जाते, माइक, पाव, किटली, भाजीपाला, फळे, संगणकाचे साहित्य, झोपाळा, खाद्यपदार्थाचे ताट,सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाजाची घंटा, नरसाळे, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, करनी-थापी, सेफ्टी पिन- टाचणी, स्पॅनर-पाना, तंबू, टायर, लोकर आणि सुई, कपाट, दुर्बीण, कॅन, नारळाची बाग, दरवाजाचे हँडल, ऊ स-शेतकरी, शिरस्त्राण, पत्रपेटी, नासपती, करवत, स्टेप्लर, भालाफेक, बिस्किट, सिमला मिरची, कलर ट्रे-ब्रश, ड्रिल मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, टीलर, व्हायोलिन, फळा, गालिचा, मोबाइल चार्जर, संगणक, डंबेल्स, गॅस शेगडी, वाळूचे घड्याळ, हंडी, कात्री, स्टूल, टॉफीज, चालण्याची काठी, बेबी वॉकर, कॅरम बोर्ड, संगणक माऊस, आइस्क्रीम, जेवणाचा डबा , कूकर, शिवणयंत्र, स्टॅम्प्स, चिमटा, फुलकोबी, खाट, विजेचा खांब, अद्रक, पाणी गरम करण्याचा रॉड, तुतारी वाजवणारा माणूस, पेन स्टँड, पंचिंग मशीन, जहाज, झोपाळा, पाकीट, बांगडय़ा, लिफाफा, काचेचा पेला, काडेपेटी, पेन्सिलचा डबा, टूथ पेस्ट.