गेल्या तिन महिन्यांपासून राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. जवळपास १०० दिवस उलटुन गेली तरी राज्यभरातून लंपीची लागण झालेल्या गुरांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. तरीही परिस्थिती अजुन आटोक्यात आली नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात लंम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. अनेक जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला असुन शेतकऱ्यांना मोठ नुकसान झालं आहे. लंम्पीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या बघता राज्यभरातील पशुधनावर धोक्याचं सावट आहे असं म्हणणं नाकारता येणार नाही. राज्यभरात सर्वाधिक लंम्पीग्रस्त जनावरांची संख्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाण्यात आतापर्यत ४ हजार पाचशे हून अधिक रुग्ण लंम्पीमुळे दगावली आहेत.
पशुवैद्यकीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडून याबाबत अजून तरी कुठलीही महत्वपूर्ण भुमिका घतल्याचं कानावर पडलं नाही. किंबहूना बळीराजा मंत्री महोदयांकडून मदतीची आस लावून बसला आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) लवकरचं याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. लम्पी प्रचंड लागण झाली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला आतापर्यंत यश मिळालं नसल्याचं दिसून आलं आहे. (हे ही वाचा:- Lumpy Skin Disease: लम्पी रोग नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; प्रत्येक जिल्ह्याला होणार औषधांचा पुरवठा, पशुधनाची हानी झाल्यास मिळणार नुकसान भरपाई )
शेतकऱ्यांचं महत्वाचं धन म्हणजे, गाय-बैल. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. आता लम्पी आजारानं शेतकऱ्यांजवळ असलेलं पशुधन दगावत असल्यानं बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. लम्पीमुळे राज्यभरात शेती, दुग्धव्यवसाय यांवरही गंभीर परिणाम पडला आहे.