Heart Attack Due To Dj: सांगलीत डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू झाल आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केलं.सांगलीतील कवठे एंकद आणि वाळवा तालूक्यात ही घटना घडली. या घटनेमुळे डीजेच्या आवाजामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? असा प्रश्न सर्वासमोर उपस्थित झाला आहे. यावर आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेवूयात ?
सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सात दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी दोघांनी गावातील एका विसर्जनावेळी सहभाग नोंदवला. मिरवणूकीत डीजेच्या दणदणाटामुळे काही वेळानंतर दोघांना अस्वस्थ वाटू लागले. दोघांपैकी एकावर काही दिवसांपूर्वी अॅंजिओप्लास्टी झाली होती असं पोलीसांनी सांगितले. दोघेही जमिनीवर कोसळले. ह्रदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला असून डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. याघटने अंतर्गत डॉक्टर काय सांगतात ते पाहूयात?
कुठलाही कार्यक्रम असो त्यासाठी लोक डॉल्बीचा वापर सर्रास करत असतात.त्यामुळे ध्वनी प्रदुषण वाढतो. शास्त्रानुसार, जेव्हा आपण जास्त प्रमाणात आवाज ऐकतो, तेव्हा ह्रदयातील नसा आंकुचन पावतात, त्यामुळे बीपी म्हणजे रक्तदाब वाढतो. ज्या लोकांना ह्रदयविकाराचा त्रास आधीपासून होत असेल तर त्याना ध्वनीप्रदुषणामुळे ध्वनिप्रदुषणामुळं हृदयाच्या नसा आंकुचित होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची व मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा लोकांनी जिथे जोरात डिजेचा आवाज आहे त्याठिकाणी जाणे टाळावे, असे डॉक्टर माहिती देत असतात.
एका अहवालानुसार, ध्वनीप्रदुषण आणि ह्रदय विकार थेट संबंध असल्याचे स्षट सांगितले आहे. ज्या ठिकाणी गोंधळाचे आणि आवाजाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच ध्वनी प्रदुषणाची तीव्रता अधिक आहे तिथल्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या अधिक तीव्रतेने जाणवते. या परिसरातून हृदयविकाराचे प्रणाण 72 टक्क्यांनी वाढते. या अहवालानुसार 20 पैकी 1 मृत्यू हा ध्वनी प्रदुषणामुळं होण्याची शक्यता जास्त आहे. रात्री झोपताना आजू बाजूच्या परिसरात आवाजाची तीव्रता ३० ते ५० डेसिबल इतकी असावी असं डॉक्टर सांगतात.