Ganpati Visarjan Muhurat 2023: गणेश चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपतीत बाप्पाचे विसर्जन केले जाते. खरे तर गणपती विसर्जनासाठी वेगवेगळे मुहूर्त असतात. दीड दिवसाच्या गणपतीचा वेगळा, पाच दिवसांच्या आणि सात दिवसांच्या गणपतीचा वेगळा. पण, अनंत चतुर्दशी हा एक असा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही केव्हाही गणपतीचे विसर्जन करु शकता. पण काही लोकांमध्ये खास करुन अधिकच भक्तीमय असलेल्या लोकांमध्ये त्याही दिवशी मुहूर्त शोधून गणपती विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे लोक अनंत चतुर्थी दिवशीही मुहूर्त शोधतात. अर्थात त्याला फार महत्त्व असतेच असे नाही. कारण तो दिवसच मूळत: त्यासाठी असतो, असे मानले जाते.
अनंत चतुर्दशी पूजा मुहूर्त: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्दशी तिथीची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी रात्री 10.19 वाजता होत आहे. तर त्याची समाप्ती 28 सप्टेंबरच्या सायंकाळी 4.49 वाजता होईल. त्या दिवशी भगवान विष्णुच्या पूजेचा मुहूर्त सकाळी 6.20 पासून सायंकाळी 6.49 पर्यंत आहे, असे काही अभ्यासक सांगतात.
गणपती विसर्जन मुहूर्त: धार्मिक विषयातील अभ्यासक सांगतात की, पंचांगानुसार 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिवशी गणपती विसर्जनाचे तीन मुहूर्त आहेत. पहिला सकाळी 6.16 ते 7.40 वाजेपर्यंत, सकाळी 10.42 ते दुपारी 2.10 पर्यंत आणि नंतर दुपारी 4.41 ते 9.10 वाजेपर्यंत. या वेळेत आपण केव्हाही गणपती विसर्जन करु शकता.
गणपती विसर्जन हे हे श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक उत्सव यांचे यांचा अनोखा मिलाप आहे. या काळात लोक आपल्या भक्तिमय जाणीवा निसर्गाशी जुळवून घेतात. त्यातूनच भक्तीच्या एका वेगळ्याच आनंदाला उधान येते. त्यामुळे हा उत्सव भारतीय संस्कृतीची लवचिकता आणि वेगळेपणाचा अमिठ ठसा उमठवून जातो.