Patient, Food प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay, Wikimedia Commons)

Pune Shocker: प्रत्येक गावात गरोदर महिलांना आरोग्य विभागाकडून पोषक आहार मिळत असतो. पण हाच पोषक आहार निकृष्ठ दर्जाचा असल्याने महिलांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील आरोग्य विभागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, गोव्यातील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर तालुक्यात आंबळे गावात गरोदर महिलांसाठी पुणे परिषदाकडून पोषक आहार येत असतो. आंबळे गावात आरोग्य विभागात गरोदर असणाऱ्या बालकाची उत्तम प्रकारची शक्ती मिळावी, यासाठी शासनाकडून पोषक आहार म्हणून किट दिला होता. मात्र, या किटमध्ये काही पदार्थांमध्ये किडे आढळले होते. या किटमध्ये बदाम, खारीक,काजू , गुळ आणि इतर पोषण आहार होता.

कीटमध्ये असलेल्या गुळ  आणइ काजूमध्ये कीडे दिसून आल्या. महिलेनी या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिली. संतप्त महिलांनी आरोग्य विभागाला सुरक्षेतेचा प्रश्नचिन्ह उभारला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतप्त महिलांनी सांगितले की, गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिले जात आहे. आरोग्य विभागाकडून निष्काळजीपणा समोर आल्याने गरोदर महिलांनी आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.