Minor Rape Case (Photo Credit- Pixabay)

Goa Crime: दक्षिण गोव्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील वास्को येथे घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. संतापजनक बाब म्हणजे ज्यावेळीस गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी 15-20 लोक उपस्थित होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- रिल बनवण्यावरून दोन गटात तुफान मारामारी, उत्तर प्रदेशातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक सुनीता सांवत यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात असून दिसून आले की, मुलीवर बलात्कार करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी इमारतीत काम करणार्या 15 ते 20 मजुरांना पकडले आहे. वास्को पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376, 302 अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्यात घडणारी पहिलं घटना नाही. गोव्यात गुन्हे गारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना शुक्रवारी साडे तीन वाजता हॉस्पिटलमधून फोन आला की, पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह  आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरु आहे.