 
                                                                 'कोल्हापुरी चप्पल' (Kolhapuri Chappal) हे जीवघेणे हत्यार होऊ शकत नाही, असा निर्वाळा देत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) एका प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला दखलपात्र गुन्हा रद्द केला. पोलिसांनी कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' (Dangerous Weapons) संबोधून भारतीय दंड संहिता कलम 324 अन्वये एका विरुद्ध चक्क दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. जो न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी निकाल (Aurangabad Bench Judgment) देत रद्द करण्याचे आदेश दिले.
घटना तशी साधी आहे. परंतू, पोलिसांनी त्याला दखलपात्र गुन्ह्याचे स्वरुप दिल्याने त्याचे गांभीर्य वाढल्याचे न्यायालयाच्या निकालावरुन पुढे आले आहे. सदर घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावातील आहे. या गावातील रहिवासी अनंत मंचकराव देशमुख यांनी तक्रार दिली होती की, त्यांचा सख्खा भाऊ मंगेश मंचकराव देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी घरात घुसून त्यांना चप्पलेने (कोल्हापुरी) मरहाण केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी चक्क भादंवि कलम 452,324,323,504 अन्वये दखलपात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात फौजदारी खटला दाखल झाला. परिणामी अटकपूर्व जामीनासाठी मंगेश मंचकराव देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी अॅड. हनुमंत जाधव यांच्यामार्फत कोर्टात धाव घेतली. या वेळी झालेल्या सुनावणीत न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी निकाल देत दखलपात्र गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच, 'कोल्हापुरी चप्पल' हे जीवघेणे हत्यार होऊ शकत नाही, असा निर्वाळाही दिला.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
