Dense Fog and Cold | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Update: कधी गरम कधी थंड अशी काहीशी वातावरणाची विचित्र स्थिती राज्यामध्ये पाहाला मिळत आहे. देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले आहे. इतके की, पारा शून्य अंशाच्या खाली घसरल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातही तपामानात मोठा बदल झाला आहे. हवामान विभगाने वर्तवलेल्या अंदाजामध्ये (IMD, Weather Forecast) राज्यात तापमान वाढण्याची शक्यता असली तरी, गारठाही कायम राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात झालेल्या नोंदीनुसार राज्यात तापमानाची नोद नीचांकी म्हणजेच 6 अंश सेल्सिअस इतकी झाली.

सपाट भूभाग असलेल्या प्रदेशात थंडी

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिण अंदमान समुद्रात वाऱ्याची चक्राकार स्थिती उत्पन्न होण्याची संभाव्य शक्यता राज्यातील वातावरणावर परिणामकारक ठरतील. हवामान अंदाज विचारात घेता  प्रामुख्याने समुद्रात नव्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा विशेष फटका वातावरणास बसू शकतो. समुद्रातील स्थिती बदलल्याने पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सपाट भूभागावरील प्रदेश अशी ओळख असलेल्या पंजाबच्या 'अदमपूर' येथे शनिवारी (13 डिसेंबर) हंगामातील नीचांकी उणे 0.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Mumbai Weather Update: निरभ्र आकाश, हवेत गारवा; मुंबईत वातावरण अल्हाददायक; जाणून घ्या आजचे तापमान)

समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र

लक्षद्वीप भागात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे त्रेज्ञ हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागेल आणि ते पुढे कमोजर होईल. महाराष्ट्रातील हवामानात हा बदल आज म्हणजेच 14 डिसेंबरपासून पाहायला मिळू शकते. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग अडथळे निर्माण झाल्याने काहीसा मंदावेल. ज्यामुळे गारवा कमी होण्यास मदत होईल. पण, त्याच वेळी दक्षिण द्वीपकल्पातून वाहणारे थंड वारे वाहू शकते. त्यातच बंगालच्या उपसागरात पुन्हा एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात तापमानवाढ आणि थंडी असा काहीसा विचित्र बदल पाहायला मिळू शकतो.

दरम्यान, वातावरणातील या सातत्यपूर्ण आणि कमी कालावधीत होणाऱ्या बदलाचा शेतकऱ्यांना अधिक फटका बसतो आहे. डाळींब शेतकऱ्यांसमोर थंडीमुळे डाळींब उकलण्याचा आणि त्यावर टीपके पडण्याचा धोका आहे. तर द्राक्ष बागायतदारांसमोरही पीकांना होणारा बुरशीजन्य आजार धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हरबरा पिकासाठी गाटआळी, गव्हासाठी तांबेरा आणि ज्वारी पिकासाठी चिकटा रोग फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वातावरणातील हा बदल नवी आव्हाने घेऊन येणारा ठरत आहे. दुसऱ्या बाजुला प्रेमी युगूल आणि थंडीचे चाहते यांच्यासाठी मात्र हिवाळा हा जणू गळ्यातील ताईतच. ते मात्र या वातावरणीय बदलाचे स्वागत मोठ्या प्रेमळपणे करताना दिसत आहेत.