मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज निरभ्र आकाश आणि अल्हाददायक वातावरण (Mumbai Weather Update) पाहायला मिळू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) अर्थातच आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. शहरातील तापमान आज (10 डिसेंबर) किमान 16 अंश सेल्सियस तर कमाल 37 अंश सेल्सियस इतके राहिल. सामान्य तापमानासह शहरातील वातावरण दिवसभरासाठी अल्हाददायक राहील. शिवाय, तापमानात (Mumbai Temperature) दिवसभरामध्ये विशेष बदल संभवत नसल्याचेही आयएमडीने म्हटले आहे. मात्र, हे शहर समुद्रकिनारपट्टीवर वसल्याने समुद्रातील भरती आणि ओहोटीचा तापमानावर परिणाम होतो. दरम्यान, नाही म्हणायला सूर्य जसजसा चढू लागेल तसे दुपारपर्यंत तापमान काहीसे वाढू लागेल. अशा वेळी हायड्रेटेड राहणे आणि सैलसर आरामदायी कपडे वापरल्याने नागरिक वाढत्या तापमानाचा सहज सामना करु शकततील, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मुंबईच्या समुद्रातील भरती ओहोटीची वेळ
- समुद्र भरती: सकाळी 6.34 वाजता समुद्रात पहिल्या भरतीस सुरु होईल. या वेळी साधारण 3.79 मीटर्सच्या लाटा उसळतील. समुद्रात दुसरी भरती सायंकाळी 7.59 वाजता सुरु होईल आणि त्या वेळी समुद्रात 3.48 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळू शकतात.
- समुद्रातील ओहोटी: समुद्रातील पहिली ओहोटी मध्यरात्री 12.22मीनिटांनी सुरु होईल. या वेळी साधारण 1.78 मीटर्सच्या लाटा उसळतील. तर दुसरी ओहोटी मध्यरात्री 1.30 वाजता पाहायला मिळेल, या वेळी 1.02 इतक्या उंचीच्या लाटा अपेक्षीत आहेत. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: आज उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता; काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज)
दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात तापमान सामान्य राहणार असून, सकाळी 7.00 वाजता सुर्योदय झाला. तर सायंकाळी 6.02 वाजता सुर्यास्त अपेक्षीत आहे. त्यामुळे शहरातील आजचा दिवस साधारण 11 तासांचा असेल.
मुंबईसाठी पुढच्या पाच दिवसांचा हवामान अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, पुढचे पाच दिवस मुंबई शहरातील वातावरण स्वच्छ असेल. तर आकाश निरभ्र. 11 डिसेंबर रोजी तापमान साधारण 17 ते 31 अंश सेल्सियस दरम्यान असेल. पुढे 12,13,14 आणि 15 डिसेंबर दरम्यानही वातावरणात कमाल तापमान 32 अंश सेल्सियस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
दरम्यान, घराबाहेर पडून करावी लागणारी काही कामे तुम्ही जर प्रदूषण, थंडी किंवा तिव्र ऊन यांमुळे टाळली असतील तर, ती करण्यासाठी आजचा दिवस आणि विद्यमान आठवडा निश्चितच चांगला आहे. मात्र, दुपारच्या वेळी घराबाहेर पडत असाल तर, आरामदाई आणि सैलसर कपडे वापरणे फायद्याचे राहिल. शिवाय, हायड्रेटेड राहण्यास प्राधान्य द्याल तर आपली उर्जा अधिक चांगल्या प्रकारे ठेऊन कामातील कामगिरीही उत्तम राखाल, असे आरोग्य अभ्यासक नागरिकांना सूचवतात.