Weather Forecast Today

Maharashtra Weather Update: डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी (Winter)चांगलीच वाढली आहे. मात्र, दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसा उन्हाचे चटके जाणवू लागतात. मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरीही दिसत आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ (Weather Update)होत आहे. राज्यात तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेला आहे. धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.(Local Train Mega Block: आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा)

हवामान विभाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळू शकते. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या पाच दिवसात मुंबई, कोकण वगळता महाराष्ट्रात पहाटेच्यावेळी किमान तापमानाचा पारा 10 ते 12 डिग्रीपर्यंत घसरू शकतो. त्यामुळे येत्या पाच दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहरामध्ये शनिवारी किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर 34 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात दुपारी 3 वाजताचे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे 30 अंशांपर्यंत असते. तर पहाटे 5 चे किमान तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीने अधिक म्हणजे 20 डिग्रीच्या दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे. सोमवापपासून हळूहळू थंडी वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे शहरातील थंडी गायब झाली होती.मात्र किमान तापमानामध्ये घट होऊन थंडी वाढणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.