Hospital | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये कोरोना वायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) दिवसागणिक साडेतीन लाखांपेक्षा अधिक रूग्णांची भर घालत आहे. यामध्ये महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण (COVID 19 Active Patients)  आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारीच यंत्रणा अ‍ॅक्शन मोड मध्ये काम करत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये तरूणांमध्ये कोरोना फोफावत आहे आणि तो जीवघेणा ठरत असल्याचं चित्र आहे. तरूणांमध्ये हॅप्पी हायपोक्सिया असल्याने चिंता अजूनच वाढली आहे. या परिस्थितीमध्ये तुमच्या जवळ तातडीने रूग्णालयात जायची वेळ आल्यास नेमका गरजेनुसार, ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) , ICU, व्हेंटिलेटर बेड (Ventilator Bed), कोविड केअर सेंटर (Covid Care Center)  कुठे आणि कसं शोधायचं? ही चिंता तुम्हांला सतावत असेल तर खालील काही वेबसाईट, बेड ट्रॅकिंग लिंक्स, हेल्पलाईन नंबर्स नक्की जवळ ठेवा म्हणजे तुमची बेड शोधण्यासाठी धावपळ कमी होण्यास मदत होऊ शकते.( नक्की वाचा: COVID-19 RT PCR Test Report कसा वाचायचा, CT Value नेमकं कोविड 19 इंफेक्शन बद्दल काय सांगत?).

सध्या सोशल मीडीयामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड ची गरज असेल तर मदत मागण्यासाठी अनेक पोस्ट असतात. पण अनेकदा हेल्पलाईनची मोठी यादी समोर येते आणि नेमकं तुम्हांला प्रत्येक नंबर डायल करून माहिती तपासण्यासाठी वेळ असतो. मग अशा वेळी प्रशासनाकडून जारी केलेली ही वेबपोर्ट्ल  तुम्हांला मदत करू शकतात. (नक्की वाचा: Coronavirus: मुंबईच्या रुग्णालयातील बेड शोधण्यासाठी कुठे करायचा संपर्क? आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती).

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील बेड्स ची स्थिती इथे पहा

महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू कोरोना रूग्ण वाढीचा दर मंदावला आहे. काल राज्यात 51,880 रुग्णांची व 891 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 65,934 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,41,910 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यात 15 मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कडक नियमावली लागू आहे. कलम 144 लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडण्यावर बंदी आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि त्यामधील कर्मचारी बाहेर पडण्यास मुभा आहे.