Heavy Vehicles Representative Image (Photo Credits: PTI)

Ban On Heavy Vehicles At Ghodbunder: वडाळा घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गाचे (Wadala Ghatkopar-Kasarvadavali Metro Line) सुरू असलेल्या बांधकामामुळे घोडबंदर (Ghodbunder) रोडवर ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांना बंदी घातली आहे. 18 जुलैपर्यंत रात्री 11.55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही बंदी असेल. (हेही वाचा - Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू)

पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनय कुमार राठोड यांनी सांगितलं की, हजारो अवजड वाहने गुजरातमधून घोडबंदरमार्गे उरण-जेएनपीटीकडे जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. (हेही वाचा - Pune Accident: नवले परिसरात कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी, वाहन चालक जखमी)

त्याचाच एक भाग म्हणून मानपाडा ते कापूरबावडीपर्यंत बीम उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणार आहे, असंही राठोड यांनी सांगितलं.

जड वाहने कापूरबावडी येथून कशेळी, काल्हेर, अंजूरफाटा या भागातून भिवंडीत वळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.