Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते.

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

नागपूरात भीषण अपघातात घडला आहे. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. भरधाव कारने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 8 जण या अपघातात जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे.  (हेही वाचा - Pune Accident: फिरायला जाताना मध्यरात्री रस्त्यात भीषण अपघात, मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकच फोन; अन्...)

भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ उभा असलेल्या कंटेनर ट्रकला त्यांची कार धडकली. अपघात इतका भीषण होता की समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती.

दरम्यान अपघातातील जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर परसराम भेंडारकर यांच्यासह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित जखमींवर नागपुरात उपचार सुरू आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).