Pune Accident: पुणे शहरातील बारामती येथील आठ तरुण गोवाला फिरण्यासाठी दोन कारने जात होते. मात्र शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमाराम पोलादपुर घाटामंध्ये एक भीषण अपघात झाला.भरधाव येणाऱ्या टॅंकरने दोन्ही कारला धडक दिली. या अपघातात एका तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातून सात जणांचे प्राण वाचले आहेत. तरुणांना या अपघातात जखमा झाल्या आहेत. या अपघातानंतर परिस्थिती इतकी विकट होती, मध्यरात्रीच्यावेळी काय करावे ते सूचत नव्हते.
त्यातील एका युवकाने मालेगावचे कार्यकर्ते रविराज तावरे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला आणि झालेल्या दुर्घटनेची माहिती देत मदतीची विनवणी केली. कार्यकर्ते तावरे यांनी तात्काळ रात्रीच्या दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अपघाताची घटना कानी घातली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतीसाठी हात पुढे करत शक्य तितके प्रसत्न केले. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास तरुणांर्यंत योग्य यंत्रणेची मदत मिळाली. परंतू मदत मिळे पर्यंत एका यूवकाचा जागेवरच मृत्यू झाला.
दत्तात्रेय शरद टेके (वय ४३) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. टेके हा माळेगाव येथील रहिवासी होता. सात जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. अधिकाऱ्यांने देखील मदतीचा हात पुढे केला त्यामुळे या तरुणांपर्यंत मदत पोचली.