Pune Accident: पुण्यातील नवले परिसरात सोमवारच्या सकाळी घडला आहे.नवले परिसरातील मुंबई- बंगळूरू महामार्गावर कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. पुण्यातील नऱ्हे परिसरात हा अपघात घडून आला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात घडून आला. या अपघाता कोणतेही जीवीतहानी घडून आली नाही. मात्र कंटेनर चालकाला मार लागल्याचे समोर आले आहे. सुत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार, कोसळा वाहून नेणाऱ्या कंटेनर लोखंडी दुभागाला धडकला आणि पटली झाला. पलटे झाल्यामुळे कंटेनरचे संपुर्ण नुकसान झाले. नवले पुलाजवळील भूमकर पुलावर ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या चालकाला ताबेडताब रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, हा कंटेनर साताऱ्यांहून मुंबईकडे येत होता. ABP या वृत्तसंस्थेने ही वृत्त दिले आहे.





('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)