बुलढाणा येथील टक्कल व्हायरस (Buldhana Takkal Virus) अनेकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. गावातील नागरिकांना अचानक केस गळणे (Hair Loss Cause) आण टक्कल पडणे (Baldness) यांसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. ज्यामुळे गावकरी हैरान आहेत. त्यातच या टक्कल प्रकरणाची पंचक्रोशी आणि महाराष्ट्रभर चर्चा आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि आयसीएमआर (ICMR) अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर या प्रकणाचा वैद्यकीय शोधही (Hair Loss Remedy) घेतला जातो आहे. परंतू, त्याचा परिणाम गावातील तुरुण तरुणांना भोगावा लागत आहे. हे प्रकरण उद्भवल्यापासून आणि त्याची राज्यभर चर्चा झालेपासून गावातील तरुण-तरुणींच्या वैवाहीक आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, अनेक युवकांचे विवाह (Marriage) रखडले आहेत. तरुण आणि तरुणींना स्थळेही यायचे कमी झाले आहे. या भयानक प्रकारामुळे पालक आणि युवा वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
तरुणाईला लग्नाची चिंता
गावातील लहान, थोर आणि तरुणांसह महिला वर्गातही केस गळणे आणि पुढे त्याचे पर्यावसन टक्कल पडणे यात होऊ लागल्याने सर्वच गावकरी भीतीच्या छायेत आहेत. त्यातच लग्नाचे वय असलेले तरुण तरुणी दुहेरी चिंतेत आहेत. अनेक तरुण-तरुणींसमोर विवाहाचे संकट उभा राहिले आहेत. हे तरुण तरुणी विवाहासाठी इच्छुक तर आहेत. परंतू, गावता उद्भवलेला टक्कल व्हायरस आड येतो आहे. या विचित्र व्हायरसची केवळ पंचक्रोशीच नव्हे तर राज्यभर चर्चा आहे. त्यामुळे या गावातील मुलींसोबत विवाह करण्यास इतर गावचे तरुण फारसे इच्छुक नाहीत. तर दुसऱ्या बाजूला या गावातील तरुणांसोबत विवाह करण्यासाठी इतर गावातील मुली इच्छुक नाहीत. त्या इच्छुक झाल्या तरी त्यांचे पालक ही सोयरीक करण्यास राजी नाहीत, अशी स्थिती आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच या प्रकरणात लक्ष घालून काही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक गावकरी करत आहेत. (हेही वाचा, Hair Loss Causes: केस गळती संपेना, टक्कल पडणे थांबेना; ICMR म्हणे 'असला प्रकार कधीच पाहिला नाही')
आरोग्य विभाग सतर्क
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 12 ते 15 गावांमध्ये नागरिकांमध्ये अचानक टाळूला खाज येणे त्यातून पुणे केस गळणे आणि मग टक्कल पडणे अशा समस्या उद्भवल्या आहेत. या प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने तपासणी केली आणि काही नमुनेही गोळा केले. या वेळी गाव आणि परिसरातील पाणी दूषीत असल्याचे पुढे आले. पाण्यामध्ये नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे निदान झाले. तसेच, इतर काही प्रयोगशाळांना पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. असे असले तरी, दूषीत पाणीच केसगळती होण्यास कारणीभूत आहे किंवा नाही याच्या निष्कर्षापर्यंत अद्याप तरी आरोग्य विभाग पोहोचला नाही. (हेही वाचा, Hair Loss Outbreak Buldhana: केस गळणे, टक्कल पडणे प्रकरणी ICMR द्वारे चौकशी; दिल्ली, चेन्नईचे पथक बुलढाणा जिल्ह्यात)
आयसीएमआरचे पथक गावात दाखल
एका बाजूला आरोग्य विभागाने पाहणी केली असली तरी, केंद्रीय संस्था असलेली आयसीएमआर सुद्धा या प्रकरणावर काम करत आहे. दिल्ली आणि चेन्नई आयसीएमआरचे एक पथक बुलढाणा येथे दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या केसाची, त्यांच्या गळतीची आणि इतरही काही बाबींची तपासणी केली. मात्र, आपल्या संपूर्ण अभ्यास जगात अशा प्रकारची घटना कोठेही घडली नसल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले. शिवाय त्यांनी काही नमुने सोबत घेतले आहेत. या सर्व बाबींची उकल होण्यास साधारण एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे आयसीएमआरने म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या प्रकरणावर काय तोडगा काढते आणि तरुणाचीचे रखडलेले विवाह मार्गी लागतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.