पुणे शहरात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ज्याला जीबीएस (GBS) म्हणूनही ओळखले जाते, या व्याधीचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे एकाच भागात जीबीएस आजाराचे अधिक प्रमाणावर रुग्णा आढळल्याने पालिका सतर्क झाली आहे. ताज्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत 22 या सिंड्रोमची लागण (Guillain Barre Syndrome Cases Pune) झाल्याचे निदान झाले आहे. ज्यामुळे पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. मुलांपासून ते प्रौढांपर्यंतचे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड आणि धायरीसारख्या भागातील आहेत. या उद्रेकाचा संबंध दूषित अन्न किंवा पाण्याशी असल्याचा संशय आहे.
प्रभावित क्षेत्रे आणि रुग्णालये
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, नवले रुग्णालय आणि पूणा रुग्णालयासह प्रमुख रुग्णालये सध्या रुग्णांवर उपचार करत आहेत. पुणे महानगरपालिकेने (PMC) आपल्या आरोग्य विभागाला सतर्क करून आणि रक्त, विष्ठा, घशाचे स्वॅब, लाळ, मूत्र आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (सीएसएफ) यासह जैविक नमुने विश्लेषणासाठी आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) कडे पाठवून त्वरित कारवाई केली आहे. (हेही वाचा, Guillain-Barre syndrome, दुर्मिळ न्युरोलॉजिकल सिंड्रोम मुळे Peru ,मध्ये Health Emergency; जाणून घ्या लक्षणं काय?)
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा दुर्मिळ विकार आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते, जी अनेकदा संसर्गामुळे उद्भवते. लक्षणांमध्ये गंभीर अवयव कमकुवत होणे, अर्धांगवायू आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनाचा त्रास यांचा समावेश होतो. संभाव्य जीवघेणा असला तरी, वेळेवर वैद्यकीय उपचार केल्याने तो बरा देखील होतो. (हेही वाचा, Human Metapneumovirus: पुण्यात 'ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस'बाबत PMC ॲक्शन मोडमध्ये; नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखीव)
मुलांवर झालेला परिणाम
नोंदवलेल्या 26 प्रकरणांपैकी 11 प्रकरणांमध्ये 8 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. दूषित अन्न खाल्ल्यानंतर अनेक मुलांमध्ये अर्धांगवायूसह गंभीर लक्षणे दिसून आली. एका आठ वर्षांच्या मुलाला अस्पष्ट बोलणे, पापण्या खाली पडणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागले. मुलाचा आजार इतका बळावला की, त्याला व्हेंटिलेटरच्या आधाराची आवश्यकता भासली. धायरी येथील एका 12 वर्षांच्या मुलीला बाहेरील अन्न खाल्ल्यानंतर 24 तासांच्या आत अवयवांचा तीव्र अशक्तपणा आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला. (हेही वाचा, Non-Alcoholic Fatty Liver Clinic: मुंबईमधील KEM Hospital मध्ये 28 जानेवारीपासून सुरु होणार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिक; Amitabh Bachchan असणार ब्रँड ॲम्बेसेडर)
रुग्णालयातील उपचार आणि आपत्कालीन प्रतिसाद
पुणे महापालिका आरोग्य विभागाने नारिकांना ही व्याधी धोकादायक नाही त्यामुळे काळजीचे कारण नाही, असा धिर देतानाच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय 16 रुग्णांवर उपचार करत आहे, तर नवले रुग्णालय आणि पूना रुग्णालय उर्वरित रुग्णांवर उपचार करत आहेत, अशी माहिती दिली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी भर देत सांगितले: 'हा धोकादायक आजार नाही आणि रुग्ण योग्य उपचारांनी बरे होतात. आम्ही रहिवाशांना स्वच्छतेचे पालन करण्याचे आणि संभाव्य प्रकरणे टाळण्यासाठी बाहेरील अन्न टाळण्याचे आवाहन करतो.
नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना
जीबीएस सिंड्रोमचा प्रसार रोखण्यासाठी, आरोग्य अधिकारी खालील गोष्टींची शिफारस करतातः
पीएमसीचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, जनजागृती मोहिमा आयोजित करत आहेत आणि उद्रेकाचे मूळ शोधण्यासाठी तज्ञांसोबत काम करत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन बैठकही बोलावण्यात आली आहे.