Free Yoga Classes in Mumbai: 1 जूनपासून मुंबईमध्ये सुरु होणार मोफत योग वर्ग; जाणून घ्या काय असेल स्वरूप
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दैनंदिन जीवनातील वाढत्या कामाचा ताण आणि या तणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि नैराश्य यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार सतत वाढत आहेत. निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी आणि लोकांना तणावापासून मुक्त करणे आणि त्यांना निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने, बीएमसीने (BMC) 1 जूनपासून शहरात मोफत योग वर्ग (Free Yoga Classes) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी संस्थेने गुरुवारी शहरातील नामांकित योग वर्गांकडून स्वारस्य असलेल्या अभिव्यक्तींना आमंत्रि करून, त्यांना दररोज सकाळी 6 ते सकाळी 8 यावेळेत योग वर्ग आयोजित करण्यासाठी नियुक्त केले आहे.

बीएमसीने 2022-23 च्या बजेटमध्ये शहरात 200 शिव योग केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, योग केंद्रांची संख्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असेल, असे सूत्रांनी सांगितले. योग वर्गांनी प्रशिक्षित योग शिक्षक उपलब्ध करून देण्यात रस दाखवल्यानंतरच, नागरी संस्था योग केंद्रे स्थापन करेल. बीएमसीद्वारे किमान 30 लोकांसाठी शाळा, विवाह हॉल, वॉर्ड ऑफिस किंवा कोणत्याही सार्वजनिक खुल्या जागेवर हे वर्ग आयोजित केले जाऊ शकतात.

या वर्गासाठी प्रत्येक सहभागीने मॅट आणणे आवश्यक आहे. नागरी संस्था नागरिकांना संपर्कासाठी करण्यासाठी एक समर्पित ईमेल उपलब्ध करून देईल. बीएमसी प्रत्येक योग शिक्षकाला एका सत्रासाठी 1000 रुपये देईल आणि हे वर्ग आठवड्यातून पाच दिवस चालवले जातील. स्थानिक प्रभाग कार्यालये या सत्रांवर लक्ष ठेवतील, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले. (हेही वाचा: सेक्स केल्याने होऊ शकतो 'मंकीपॉक्स' आजार; गे आणि बायसेक्शुअल लोकांसाठी चेतावणी जारी)

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला आपल्या आजारावर मात केल्यानंतर आरोग्य उत्तम राहावे यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांसह वृद्ध, सहव्याधी असणारे आणि तरुणांमध्येही योगाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.