Shah Rukh Khan याने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्ज सुद्धा साखरेची पावडर होईल, छगन भुजबळ यांचा केंद्राला टोला
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शनिवारी भाजपवर आरोप लावत त्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, जर अभिनेता शाहरुख खान याने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्ज सुद्धा साखरेची पावडर समजली जाईल. भुजबळ यांनी ड्रग्ज प्रकरणी ताब्यात असलेल्या आर्यन खान याच्यावरुन भाष्य करत होते. ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्र सरकार सातत्याने एनसीबीवर निशाणा साधत आहे. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी ही एनसीबीच्या तपासावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत.(Nawab Malik on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिक यांचे जाहीर वक्तव्य) 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी असे म्हटले की, गुजरात मधील मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तपास करण्याऐवजी एनसीबी ही शाहरुख खान याच्या मागे पडली आहे. त्यावरुनच असे म्हटले की, शाहरुख खान भाजपात गेला तर ड्रग्ज हे सुद्धा साखरेच्या पीठी सारखे होतील.(Sameer Wankhede Statement On Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यावर एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचे प्रत्यूत्तर, कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा)

दरम्यान, शाहरुख खान याला एनसीबीकडून 2 ऑक्टोंबरला क्रुजवरुन अटक करण्यात आली. सध्या त्याला न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याचा जामिन अर्ज वारंवार कोर्टाकडून फेटाळून लावला जात आहे. मंगळवारी बॉम्बे हायकोर्टात त्याच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. तर आर्यन खान याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एनजीपीएस तरुंगाने आर्यन, त्याच्या मित्र अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांचा सुद्धा जामिन अर्ज फेटाळून लावला होता.