राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट (संग्रिहि, संपादित, प्रातिनिधिक प्रतिमा)

महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये राज्य सरकारने गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे जनतेला अल्पसा दिलासा मिळाला असला तरी, सरकार राज्यात सरसकट चारा छावण्या उभारणार नाही. दरम्यान, सरसकट चारा छावण्या उभारण्याऐवजी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यावरच अधिक भर देणार असल्याची माहिती, राज्याचे पशू आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी ही माहिती दिली आहे. अभ्यास, निकष, अंशत:, पूर्णत:, टक्के, मध्य, तीव्र असे शाब्दीक खेळ करता करता राज्य सरकारने अखेर राज्यातील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. हा दुष्काळ जाहीर करतानाही सरसकटपणे जाहीर न करता तो, मध्यम आणि तीव्र असे फरक केला आहे.

चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप यापूर्वीही करण्यात आहेत. त्यामुळे राज्य सरकार सावध पावले टाकत आहे. या सावधानतेतूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. दरम्यान, हे पैसे जमा करण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांकडे अललेल्या जनावरांची पशु गणना करेन. त्यानंतरच जी काही आर्थिक रक्कम असेन ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.  (हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

दरम्यान, शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी महिला बचत गटांचा वापर माध्यम म्हणून करण्यात येईल. या बचत गटांच्या माध्यमातूनच पशु संवर्धन विभाग चारा डेपो उभारणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पण, हे सगळे करुनही जर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही, असे जर सरकारच्या ध्यानात आले तर त्यानंतरच चारा छावण्या उभारल्या जातील. पण, कोणत्याही स्थितीत सरकार राज्यात सरसकट चारा छावण्या उभारणार नाही, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.(हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

दरम्यान, राज्य सरकारने या वेळी सरसकट दुष्काळ जाहीर केला नाही. तर, राज्यातील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्येच तो जाहीर केला आहे. त्यातही दुष्काळाची तीव्रता पाहून गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असा त्यात भेदही केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर, राज्यातील काहीच भागात दुष्काळ असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी केवळ २६ जिल्ह्यांमध्ये तर, एकूण ११२ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे.