प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहितसंपादित प्रतिमा)

राज्यातील दुष्काळाने (Drought)आता परिसीमा गाठली आहे. विदर्भ, मराठवाडा येथे जनतेच्या पिण्याची भ्रांत आहे, तिथे जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. मान्सून (Monsoon) लांबणीवर पडल्यामुळे अजून काही दिवस तरी ही परीस्थिती राहणार आहे. सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय घेतला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या (Chara Chavani) सुरु केल्या गेल्या आहेत. आता यामध्ये दिलासा म्हणजे पहिल्यांदाच राज्यात शेळ्या आणि मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरु करण्यात येणार आहेत.

शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावणी सोबत, जनावरांसाठी टँकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. (हेही वाचा: राज्यात जनावरे घोटाळा उघडकीस; चारा छावण्यांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून भ्रष्टाचार)

बैठकीमधील महत्वाचे निर्णय –

  • चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये
  • चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे सुरू करावी
  • औरंगाबाद विभागीय आयुक्तांना चारा छावण्यांसाठी 111 कोटी रुपये देण्यात यावेत.

या बैठकीला, चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी मंडळी उपस्थित होते. दरम्यान सध्या राज्यात 6209 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याचा फायदा 4920 गावांना होत आहे. आता शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी आणि कधी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.