महाराष्ट्रातील दुष्काळ (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

..अखेर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. यापूर्वीच्या राज्य सरकारांनी जाहीर केलेल्या दुष्काळाप्रमाणे विद्यमान सरकारने राज्यात सरककट दुष्काळ जाहीर केला नाही. तर, तो महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि तालुक्यांसाठीच केला. त्यातही गंभीर आणि मध्यम अशा पद्धतीचा भेद करत राज्य सरकारने दुष्काळाची तीव्रता ठरवली आहे. तसेच, राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी केवळ २६ जिल्ह्यांमध्ये आणि त्यातील ११२ तालुक्यांचा समावेश केला आहे. म्हणूनच जाणून घ्या दुष्काळाच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे काय? महत्त्वाचे असे की, काही जिल्ह्यांची नावे गंभीर आणि मध्यम अशा दोन्ही पद्धतीच्या दुष्काळ यादीत आली आहे. ही यादी तालुक्यात असलेल्या गंभीर आणि मध्यम पद्धतीच्या दुष्काळानुसार तयार करण्यात आली आहे.

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असलेले जिल्हे (कंसात तालुक्यांची संख्या)

(*यादी राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार)

सांगली (५), सातारा (१) सोलापूर (९), पालघर (३), धुळे (२) जळगाव(१३), नंदुरबार(३) नाशिक(४), अहमदनगर(११), औरंगाबाद(९), बीड(११), जालना(७), नांदेड(२), उस्मानाबाद(७), (परभणी(६), हिंगोली(२), अमरावती(१), बुलडाणा(७), यवतमाळ(६), चंद्रपूर(१) नागपूर(२)

(हेही वचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी तालुक्याच्या यादीत तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

मध्यम स्वपरूपाचा दुष्काळ जाहीर झालेले जिल्हे (कंसात तालुक्यांची संख्या)

पुणे (७), सातारा (२), धुळे (१) नंदुरबार (१), नाशिक (४), नांदेड (१), हिंगोली (१), लातूर(१), अकोला(५), अमरावती(४), बुलडाणा(१),वाशिम (१), यवतमाळ (३), चंद्रपूर(४), नागपूर(१), वर्धा (२)