Abishek Porel (Photo Credit - X)

DC vs RR IPL 2025 32nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 32 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium, Delhi) खेळवला जात आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल (Axar Patel) करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेकून जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

अभिषेक पोरेलने 49 धावांची दमदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 188 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेलने सर्वाधिक 49 धावांची दमदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्या व्यतिरिक्त, केएल राहुल 38 तर अक्षर पटेलने 34 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: Bat Check In IPL 2025: लाईव्ह सामन्यात अंपायर्सकडून खेळाडूंची बॅट होतेय चेकिंग, नेमकं कारण तरी काय? घ्या जाणून)

जोफ्रा आर्चरने घेतल्या दोन विकेट

दुसरीकडे, जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. राजस्थान रॉयल्स कडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत 189 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांच्या खात्यात दोन गुण मिळवायचे आहेत