LSG vs DC IPL 2025: एलएसजी विरुद्ध डीसी आयपीएल 2025 सामन्यापूर्वी सराव करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) 'चंपक' नावाच्या रोबोट कुत्र्यासोबत (IPL Robot Dog) मजेदार वेळ घालवला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार टीममधील सहकाऱ्यांसोबत सावरकरताना अचानक चंपक त्याच्या जवळ जातो. अरुण जेटली स्टेडियममधील सराव सत्रादरम्यान चा हा प्रसंग आहे. जिथे आयपीएल रोबोट श्वान 'चंपक' दिसताच अक्षर पटेलने त्याला नमस्कार केला. त्याशिवाय, तुला गुजराती येते का? असे त्याला विचारले. व्हिडीओत अक्षरसोबत समीर रिझवी देखील दिसत आहे. त्याला नमस्कार करायला सांगितले.
अक्षर पटेलने आयपीएलमध्ये रोबोट 'चंपक' सोबत साधला संवाद
Bapu talking to a robotic dog in Gujarati was not on our 2025 bingo card 😂🐶 pic.twitter.com/VSo5KoB5MO
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)