Pope Francis (फोटो सौजन्य - x/@PolitlcsGlobal)

Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांना नुकतेच रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसांसंदर्भातील संसर्गाने ग्रासले होते. ज्यामुळे त्यांच्या मूत्रपिंडांमध्येही निकामी होण्याचे सुरुवातीचे टप्पे दिसू लागले. यापूर्वी, 2021 मध्ये, त्यांना रोममधील त्याच जेमेली रुग्णालयात 10 दिवसांसाठी दाखल करण्यात आले होते.

सांता मार्टा निवासस्थानी निधन -

व्हॅटिकनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी इस्टर सोमवार रोजी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी, कासा सांता मार्टा, व्हॅटिकन येथे निधन झाले.'

पोप फ्रान्सिस यांचे निधन -

पोप फ्रान्सिस हे त्यांच्या साधेपणा, दयाळूपणा आणि गरिबांबद्दल सहानुभूतीसाठी ओळखले जातात. त्यांनी जगासमोर साधे जीवन जगण्याचे उदाहरण घालून दिले आहे. पोप अनेकदा सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण, निर्वासितांचे हक्क आणि धार्मिक सहिष्णुता यासारख्या मुद्द्यांवर उघडपणे बोलले. चर्चमध्ये पारदर्शकता आणि सुधारणा आणण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी पुढाकार घेतले आहेत. त्यांचा असा विश्वास होता की, चर्चने केवळ परंपरेशीच नव्हे तर आधुनिक युगातील आव्हानांशी देखील जुळवून घेतले पाहिजे.