धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे समजले जाणारे राज घनवट यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला आहे. पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र याबाबत अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्या म्हणतात- ‘राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.’
याआधी दमानिया यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेसमध्ये डायरेक्टर असलेले, राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट यांच्यावर 11 शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊन 20 कोटींच्या जमिनीचा 8 लाखात व्यवहार केल्याचे दमानिया म्हणाल्या होत्या. (हेही वाचा: Zeeshan Siddique Death Threat: झीशान सिद्दीकी ला पुन्हा इमेल द्वारा जीवे मारण्याची धमकी; 10 कोटी खंडणी ची मागणी)
मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू-
खूप खूप धक्कादायक !
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.
पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते.
राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने… pic.twitter.com/m7LmqE35wD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)