Baba Siddique and Zeeshan Siddique | X @ANI

एनसीपी नेते आणि माजी अमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ईमेल द्वारा त्यांना ही धमकी देण्यात आली असून मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 12 ऑक्टोबर 2024 ला झीशनचे वडील बाबा सिद्दीकी यांच्यावर प्राणघातक हल्ल्यानंतर आता झीशनही हल्लेखोर्‍यांच्या रडार वर आहे. 'बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल' असा धमकीचा इमेल आहे. झीशान ला देण्यात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे.

झिशान ला इमेल द्वारा धमकी देण्यात आल्यानंतर आता त्यामागे कोण आहे? याचा तपास सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, झीशानला आतापर्यंत किमान तीन धमकीचे ईमेल आले आहेत, प्रत्येक ईमेलचा स्वर तीव्र आहे. या मेसेजमध्ये त्याच्या वडिलांच्या हत्येचे संदर्भ होते आणि जर खंडणीची रक्कम दिली गेली तर पुढील सूचना शेअर केल्या जातील असे सूचित केले आहे. नक्की वाचा: Blood Of Lion In My Veins: 'माझ्या शरीरात सिंहाचे रक्त धावत आहे, मी अजूनही इथेच आहे, लढाई संपली नाही'; वडिलांच्या मारेकऱ्यांना Zeeshan Siddique चे आव्हान. 

बाबा सिद्दीकी यांची दसर्‍याच्या रात्री हत्या

बाबा सिद्दीकी यांची दसर्‍याच्या रात्री हत्या करण्यात आली आहे. मागील वर्षी नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मिरवणूकीतील गर्दीचा फायदा घेत बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी वांद्रे पूर्व भागात झिशानच्या कार्यालयाबाहेरच हल्ला केला होता. छातीत गोळ्या लागल्याने बाबा सिद्दीकी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई गॅंग असल्याचं सांगितलं जात आहे मात्र झिशानने यामागे बिल्डर लॉबीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

झिशानने हे देखील निदर्शनास आणून दिले की त्यांच्या वडिलांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामांकित केले जाणार होते आणि बाबा सिद्दीकीची हत्या झाल्यानंतर दोन दिवसांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी शपथविधी देखील होणार होता.