Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील शिवगंगा येथे भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात जवळपास 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा या घटनेत अपघात झाला आहे. सेम्बूर कॉलनीजवळ हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणती जिवीतहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, महामंडळाच्या बसचे आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताचे कारण समोर आलेले नाही.

तामिळनाडूत भीषण अपघात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)