BAN vs ZIM 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
Bangladesh National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ (BAN vs ZIM) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर यजमान संघाने 13 षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या होत्या. मात्र, ते अजूनही 25 धावांनी मागे आहेत. बांगलादेशकडून महमूदुल हसन जॉय 28 धावांवर आणि मोमिनुल हक 15 धावांवर नाबाद आहेत. तर ब्लेसिंग मुझारबानीला एक विकेट मिळाली. याशिवाय दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचा संघ 273 धावांवर बाद झाला. पाहुण्या संघाकडून ब्रायन बेनेटने 57 धावा आणि शॉन विल्यम्सने 59 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने गोलंदाजीत सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर नाहिद राणाने तीन विकेट घेतल्या. सध्या तिसऱ्या दिवशीचा खेळ खूप महत्त्वाचा असेल. सर्वांचे लक्ष बांगलादेशच्या फलंदाजांवर असेल.
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस कधी खेळला जाईल?
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 एप्रिलपासून खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सिल्हेट येथे खेळला जात आहे.
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहाल?
बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण अद्याप जाहीर झालेले नाही. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे 11 खेळैडू
बांगलादेश: महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, झाकेर अली (विकेटकीपर), तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद, नाहिद राणा
झिम्बाब्वे: बेन कुरान, निक वेल्च, क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, शॉन विल्यम्स, वेस्ली मधवेरे, न्याशा मायावो (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, व्हिक्टर न्याउची
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2025 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

