Marathi Ukhane For Marriage (Edited Image)

Marathi Ukhane For Marriage: महाराष्ट्रात प्रत्येक पारंपारिक कार्यक्रमात नाव घेण्याची परंपरा आहे. अशातचं आता सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अशावेळी नातेवाईकांकडून उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. उखाणे घेणे ही लग्नातील मजेशीर परंपरा आहे. नववधू नवीन घरात प्रवेश करताना तिला उखाणा घेण्याचा आग्रह (Ukhane For Marriage) केला जातो. लग्न ठरल्यानंतर उखाण्याची परंपरा दिवसेंदिवस चालत आली आहे.

तुमचंही लग्न ठरलं आहे का? तुम्ही देखील लग्नात नाव घेण्यासाठी उखाणा शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी उखाणे (Marathi Ukhane) घेऊन आलो आहोत. तुम्ही हे खास उखाणे घेऊन लग्नाच्या विधी अधिक उत्साहात साजरे करू शकता. खालील सोपे आणि मजेशीर उखाणे घेऊन तुम्ही नातेवाईकांमध्ये स्वत:चं कौतुक करून घेऊ शकता.

लग्नात नाव घेण्यासाठी खास उखाणे -

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,

….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

घातली मी वरमाला हसले …. राव गाली,

थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,

…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,

…. बरोबर संसार करीन सुखाचा.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,

…. चं नाव घेते देवापुढे.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास,

…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,

…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,

…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,

………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,

…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी

…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,

—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,

……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,

…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

शेल्या शेल्याची बांधली गाठ,

…….नाव मला तोंडपाठ.

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते

….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी

…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी

सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट

……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट

लग्न समारंभात सप्तपदी, गृहप्रेवश आणि सत्यनारायण पूजेच्या वेळी उखाणा घेण्याची परंपरा आहे. तुम्ही वरील खास उखाणे घेऊन नातेवाईकांचा उखाणा घेण्याचा आग्रह पूर्ण करू शकता.