Vande Bharat Express will run through mountains (फोटो सौजन्य - X/@trainwalebhaiya)

Vande Bharat Express Worm Case: पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने नाश्त्याच्या पाकिटात मेलेला किडा आढळल्याचा दावा केल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर सहप्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून रेल्वे प्रशासनाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या प्रकारानंतर आम आदमी पक्ष (AAP) ने थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधत केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली आहे. 'वंदे भारतमध्ये दिलेल्या नाश्त्यात किडा आढळला! अर्धवेळ रेल्वेमंत्री आणि पूर्णवेळ reels मंत्री अश्विनी वैष्णव यांना ट्रेनचे reels शेअर करायला वेळ असतो, पण वास्तव काही वेगळंच आहे,' असं म्हणत आपने X (पूर्वीचं ट्विटर) पोस्टमध्ये टीकास्त्र सोडलं.

पक्षाने पुढे लिहिलं, "रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw जी, हा व्हिडिओ शेअर करणार का?" असा खोचक सवालही केला.

आपचा रेल्वेमंत्र्यांवर निशाणा

भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या आधुनिकतेचे प्रतीक म्हणून प्रचारित केल्या जात आहेत. मात्र, या प्रकारामुळे प्रतिमेतील वास्तवाचं भान प्रवाशांना आलं असून रेल्वेमधील अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे प्रशासनाने तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य केले असून, या प्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. अद्याप अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.