
फॅन्ड्री (Fandry) फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)ने धर्म बदलल्याची सध्या सोशल मीडीयामध्ये जोरात चर्चा आहे. राजेश्वरीने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने हार्ट इमोजी सह Baptised अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान Baptism हा ख्रिस्ती धर्मातील विधी जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ती धर्म स्वीकरते तेव्हा केला जातो. पाण्यात डुबकी मारून हा धर्म स्वीकरला जातो. त्यामुळे आता राजेश्वरी देखील ख्रिस्ती झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजेश्वरीने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट जारी करत त्यामध्ये आपला जन्म ख्रिस्ती कुटुंबातच झाला असल्याचं म्हटलं आहे. Rajeshwari Kharat: फॅड्री चित्रपटातील शालूची आता बॉलिवूडमध्ये एंट्री! 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार .
Baptism विधी काय असतो?
ज्यू धार्मिक विधींमधून Baptism ची प्रथा उदयास आली. बायबलमध्ये,baptism हे बहुतेकदा स्वतःच्या जुन्या प्रतिमेला मागे सारून ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाशी जोडले जाते. Baptism हा विधी येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या सार्वजनिक कबुलीचे प्रतीक समजले जाते. ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आणि ख्रिस्त व त्याच्या लोकांप्रती औपचारिक वचनबद्धता दर्शवणारा हा विधी आहे. Baptism मध्ये पाणी ओतलं शिंपडलं किंवा पाण्यात बुडवलं जातं. त्यासोबत ही शुद्धीकरण प्रक्रिया समजली जाते आणि ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आणि ख्रिश्चन समुदायात प्रवेशाचे प्रतीक समजले जाते.
अभिनेत्री राजेश्वरी खरात ची पोस्ट
View this post on Instagram
राजेश्वरीने फॅंड्री या चित्रपटात 'शालू' ची भूमिका साकरली होती. राजेश्वरी मूळची विदर्भातील आहे. घरात सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली राजेश्वरी पहिल्यांदा 2014 साली नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्री मध्ये दिसली होती. नंटर आयटमगिरी सिनेमा आणि काही प्रोजेक्ट्स मध्ये तिने काम केले आहे.