
Maye Musk Birthday: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकेतील आघाडीचे उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) यांच्या आईचे नाव मेय मस्क (Maye Musk) आहे. मेय मस्कने तिचा 77 वा वाढदिवस भारतात साजरा केला. या प्रसंगी, मेय मस्क यांचा मुलगा एलोन मस्क याने मुंबईत आपल्या आईला खास फुले पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 77 वर्षीय मे मस्क व्यवसायाने मॉडेल आहेत.
मेयने व्यक्त केला आनंद -
दरम्यान, मेयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने फुलांसह स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, 'एलोन मस्क, मुंबईत वाढदिवसाची फुले पाठवल्याबद्दल धन्यवाद. 77 वर्षांचे होणे खूप छान आहे.' (हेही वाचा - PM Modi Meets Elon Musk: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या भेटीपूर्वी पीएम मोदी यांनी घेतली Elon Musk ची भेट)
Thank you @elonmusk for sending these beautiful birthday flowers to me in Mumbai 🇮🇳 Love m ❤️❤️#ItsGreatToBe77 🎂🎉 pic.twitter.com/9Fc3hwdKix
— Maye Musk (@mayemusk) April 20, 2025
मस्कने दिलं उत्तर -
Thank you @elonmusk for sending these beautiful birthday flowers to me in Mumbai 🇮🇳 Love m ❤️❤️#ItsGreatToBe77 🎂🎉 pic.twitter.com/9Fc3hwdKix
— Maye Musk (@mayemusk) April 20, 2025
एलोन मस्कनेही त्यांच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने आईसाठी एक गोड संदेश लिहिला, 'आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.'
मेय मस्क यांचा जन्म 1948 मध्ये कॅनडामध्ये झाला. मेय मस्क गेल्या 50 वर्षांपासून मॉडेलिंग करत आहेत. ती व्होग, स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड आणि हार्पर्स बाजार सारख्या अनेक प्रमुख मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसली आहे. याव्यतिरिक्त, तिच्याकडे पोषण आणि खानपान या विषयात दोन पदव्युत्तर पदवी आहेत. अलिकडेच, टोरंटो विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.