कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनामुळे भारताचा इटली (Italy), जर्मनी होऊ द्यायचा नसेल तर स्वत:चे किमती आयुष्य पणाला लावायचे नसेल तर सगळ्यांनी 'घरी'च थांबायला हवे. असा इशारा देत अगदी 1896 च्या प्लेगच्या साथीतर पुण्यात टिळक, अगरकर यांच्यापासून सर्वच मातंब्बरांनी स्वत:ला 'क्वारंटाइन' (Quarantine) केले व शहराबाहेरच्या तंबूत जाऊन राहिले होते. याचीच आठवण करुन देत आता आता शहराबाहेर जाण्याची गरज नाही. घरातच राहायचे आहे, असे अवाहन शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) करण्यात आले आहे.
राज्याने 'लॉकडाऊन' करुन योग्य आणि आवश्यक पाऊल उचलले आहे. जनतेनेही एका निश्चयाने, जिद्दीने त्याला साथ देत संयम दाखवायला हवा. तसे झाले तर मुख्यमंत्री म्हमाले तशी कोरोनाची वजाबाकी करण्यात महाराष्ट्र नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद सामनातून व्यक्त करण्यात आला आहे. (हेही वाचा, जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन)
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात 'जनता कर्फ्यू' एक हजार टक्के यशस्वी झाला. लोक रविवारी घरीच थांबले, संध्याकाळी थाळ्या वैगेरे वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. हे सगळी ठीक असले तरी, कोरोनाचा आपल्या देशाला खरा धोका आताच आहे. त्या दृष्टीने पुढील एक-दो आठवडे अतिशय संवेदनशील आहेत, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.
कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी देशातील, राज्यातील आरोग्य विभाग, राज्य सरकार-केंद्र सरकारचे कर्मचारी, पोलीस दल आणि ज्ञात अज्ञात लोक जे काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्याचे काल सायंकाळी पार पडले. त्यासाठी अवघ्या देशाने ताटं, घंट्या आणि हाताने टाळ्या वाजवल्या. या सगळ्या प्रकारात काही उती उत्साही लोकांचे भान सुटले. हे लोक घराबाहेर येऊन सोसायटी, रस्ते, मैदाने, चौक अशा मिळेल त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी गर्दी केली. ही गर्दी म्हणजे पंतप्रधानांनी केलेल्या आणि राज्य सरकारने अवलबंबलेल्या धोरणाचा आणि अवाहनाचे उल्लंघन होते. सरकारने गर्दी टाळण्यास सांगितले असतानाच लोकांनी ही गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.