Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील  मुंबईमध्ये कोरोनाबधितांपैकी दुसरा  बळी  गेला आहे. दरम्यान उपचारादरम्यान आज (22 मार्च)  63 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांपैकी मृतांचा आकडा आता 5 झाला आहे. आज मुंबईतील H.N. Reliance हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा परदेशी प्रवासाचा इतिहास होता. सध्या देशामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 324 झाला आहे. आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 10 नव्या रूग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोना बाधित 74  झाले आहेत. तर आज मृत पावलेल्या रूग्नाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृद्य विकाराचाही त्रास असल्याचं महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशात कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता नागरिकांनी अधिक सजग होण्याची वेळ  आली आहे. 31 मार्च पर्यंत सरकारने खाजगी संस्था, ऑफिस बंद ठेवण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. आज भारतभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी  'जनता कर्फ्यू'चं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 मध्ये नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  . Coronavirus In Maharashtra: आजपासून मुंबई लोकलमध्ये सामान्यांना प्रवेशबंदी; केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी धावणार रेल्वे सेवा!

ANI Tweet

17 मार्च दिवशी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)  उपचार घेत असणाऱ्या एका 64 वर्षीय कोरोना ग्रस्त रुग्णाचा  बळी गेला होता. त्यालाही इतर आजरांचा विळखा होता. त्यामुळे त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राप्रमाणे यापूर्वी पंजाब, केरळ आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रूग्णाचा बळी गेला होता.  Janata Curfew: आपला संयम आणि निर्धार कोरोना व्हायरसवर मात करील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर सामान्य मुंबईकरांना मुंबई लोकलमधील प्रवेश रोखण्यात आला आहे. शनिवार 21 मार्चच्या रात्री उशिरा अखेर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज (22 मार्च) पासून केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍या लोकांनाच मुंबई लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई लोकलच्या एंट्री आणि एक्झिट पॉंईटवर काही विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत. चीनमधून जगभर पसरलेला व्हायरस आता झपाट्याने पसरत आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा देण्यात आली आहे.