File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

Janata Curfew: जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही थैमान घातलं आहे. देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असल्याने केंद्र तसेच राज्य सरकारकडून गर्दीत न जाण्याचे आवाहन केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज संपूर्ण देशात 'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) ची घोषणा केली आहे. त्यामुळे आज कोणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आज सकाळपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून देशवाशियांना घराबाहेर न पडण्याचं आणि जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. (हेही वाचा - भारतामध्ये जनता कर्फ्यू लागू; Coronavirus चा धोका टाळण्यासाठी देशाच्या विविध भागातून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये 'जनता कर्फ्यू सुरू होत आहे. मी विनंती करतो की, सर्व नागरिकांनी या देशव्यापी अभियानात सहभागी होऊन कोरोना विरोधातील लढाई यशस्वी करावी. आपला संयम आणि निर्धार या आजाराला पराभूत करील, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश आदी राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.