Janta Curfew (Photo Credits: ANI)

संपूर्ण जगाला हादरुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसचा धोका अधिक वाढू नये म्हणून सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज रविवार, 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले होते. या काळात नागरिकांना सकाळी 7 ते रात्री 9 या काळात घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवा वगळता आज सारे व्यवहार ठप्प राहणार आहेत. मोदींच्या या निर्णयाला देशाभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जनता कर्फ्यूची सुरुवात अगदी उत्तम प्रकारे झाली आहे.

तसंच आज संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, थाळ्या किंवा घंटी वाजवून आपल्याला या कठीण परिस्थितीत साथ देणारे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे आभार मानावे, असेही मोदींकडून सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपला व्हिडिओ ट्विट करत जनता कर्फ्यू या देशव्यापी अभियानाचा सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (Janata Curfew: आपला संयम आणि निर्धार कोरोना व्हायरसवर मात करील - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

 

देशाच्या विविध भागातून जनता कर्फ्यूची सुरुवात चांगल्या प्रतिसादात झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, पंजाब, आसाम, प्रयागराज, पश्चिम बंगाल या राज्यातून काही दृश्यं समोर आली आहेत.

महाराष्ट्रातील काही दृश्यं:

पंजाबमधील काही दृश्यं:

पश्चिम बंगाल मधील काही दृश्यं:

प्रयागराज मधील काही दृश्यं:

आसाम मधील काही दृश्यं:

भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 315 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 64 रुग्ण सापडले आहेत. ही संख्या वाढू नये म्हणून सरकार विशेष खबरदारी घेत असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहेत. मोदींनी पुकारलेल्या 'जनता कफ्यू'ला देशाच्या विविध भागातून मोदींच्या आवाहनाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र नागरिकांचा हा संयम संपूर्ण दिवसभर टिकतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.