Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!

सार्‍या महिलांसाठी नॉन पिक अव्हर्स म्हणजेच सकाळी 11-3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटची ट्रेन असा प्र्वास खुला केला आहे. पण भविष्यात सार्‍यांसाठीच लोकल सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.

Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे आता खालावत असल्याने 6-7 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या अनेकांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याचे वेध लागले आहे. रस्त्यावरील ट्राफिक कमी करण्यासाठी आणि मुंबईचं जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आता मुंबई लोकल सुरक्षित पणे सुरू करण्याचं आव्हान सरकारी यंत्रणांसमोर आहे. नुकतीच राज्य सरकार आणि संबंधित अधिकारी मंडळींची एक बैठक झाली असून त्यावर विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. यापैकी एक म्हणजे कलर कोड ई पास. सध्या ही कलर कोड ई पास यंत्रणा (Colour-Coded E-Pass) कोलकता मेट्रोमध्ये गर्दी टाळण्यासाठी वापरली जात आहे. मुंबई लोकलमध्ये ही यंत्रणा कशी राबवली जाऊ शकते? नेमकी कलर कोड ई पास यंत्रणा काय आहे? हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर जाणून घ्या या विचाराधीन पर्यायाबद्दल!

काय आहे कलर कोड ई पास यंत्रणा?

कोलकत्ता मध्ये मेट्रो पास साठी गर्दी नियंत्रणात ठेवण्यसाठी ही कलर कोड ई पास यंत्रणा राबवली जात आहे. यामध्ये रेल्वेच्या अ‍ॅप किंवा वेबसाईटवरून तुम्ही प्रवासाचं तिकीट काढू शकता. हे तिकीट प्रवासाच्या 12 तास आधी काढण्याची सोय आहे. यासाठी तुम्हांला नाव, मोबाईल नंबर, कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे त्याचं म्हणजेच ट्रेन पकडायचं स्टेशन, उतरण्याचं स्ट्रेशन, वेळ इत्यादी माहिती देणं बंधनकारक आहे. हा क्यु आर कोड मध्ये दिला जाणारा पास आहे. प्रत्येक तासाला विशिष्ट रंग असतो. या रंगांवरून ज्या वेळेचा हा पास आहे त्या वेळेतच त्याला प्रवास करण्याची मुभा आहे. रंग पाहून अधिकारी स्ट्रेशनमध्ये प्रवाशाला प्रवेश देऊ शकतो.

मुंबईमध्ये कामाच्या वेळा पाहता काही विशिष्ट वेळेत तुफान गर्दी पहायला मिळते. मात्र कोरोनाशी सामना करत मुंबईकरांना जनजीवन सुरळीत करायचं असेल तर काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. दरम्यान कामाच्या वेळा फ्लेक्सिबल करण्याबाबतही विचार सुरू आहे. Lawyers, Registered Clarks allow in Mumbai Locals: वकील, नोंदणीकृत क्लर्क यांना प्रायोगिक तत्वावर येत्या 23 नोव्हेंबर पर्यंत मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

सध्या मुंबई लोकल मर्यादित स्वरूपात सुरू झाली आहे. यामध्ये लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना खुली करण्यात आली आहे. सोबतच राज्य सरकारने सुरक्षा रक्षक, मुंबईचा डब्बेवाला अशा काही निवडक क्षेत्रात काम करणार्‍यांना खुल्या आहेत. तर सार्‍या महिलांसाठी नॉन पिक अव्हर्स म्हणजेच सकाळी 11-3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटची ट्रेन असा प्र्वास खुला केला आहे. पण भविष्यात सार्‍यांसाठीच लोकल सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2020 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).