Lawyers, Registered Clarks allow in Mumbai Locals: राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप कायम आहे. मात्र ठाकरे सरकारकडून अनलॉकिंगच्या टप्प्यांनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर महिलांना सुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वकिलांनाच प्रायोगिक तत्वावर येत्या 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा असणार आहे. तसेच नोंदणीकृत क्लर्क यांना सुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे.(Mumbai Local Trains Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 4 नव्या 'लेडीज स्पेशल' फेर्या आजपासून सुरू; इथे पहा महिला विशेष ट्रेन्सचं वेळापत्रक)
कोरोना व्हायरसच्या काळात जसे अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्याचप्रमाणे वकिलांना सुद्धा परवानगी द्यावी अशी याचिका बॉम्बे हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.(मुंबई मधील COVID 19 च्या स्थितीबद्दल आदित्य ठाकरे यांनी शेअर केली मोठी दिलासादायक माहिती; सोबत नागरिकांना '3' गोष्टींबाबत अजुनही सजग राहण्याचा सल्ला!)
वकिलांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु त्यासाठी वेळा ठरवुन दिल्या आहेत.
-सकाळी 8 वाजताच्या आधी
-सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
-संध्याकाळी 7 नंतर ते शेवटची ट्रेन
परंतु लोकलच्या तिकिट या वैध आयडी कार्डवर दिल्या जाणार आहेच. तसेच हायकोर्टाकडून दिले गेले आयडी कार्ड नोंदणीकृत क्लर्कला दाखवावे लागणार आहे. तर वकिलांनी लोकलने प्रवास करताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच अधिकृत कामासाठी प्रवास करता येणार असून खासगी प्रवासासाठी बंदी असणार आहे.