Mumbai locals | File Image | (Photo Credits: PTI)

WR Ladies Special Local Trains Time Table: केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबई लोकल (Mumbai Local) मधून नॉन पिक अव्हर्स म्हणजेच गर्दीच्या वेळा टाळत प्रवासाची आज (21 ऑक्टोबर) पासून मुभा दिली आहे. पण यासोबतच गर्दीच्या वेळेत मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावर महिलांसाठी 4 नव्या लेडीज स्पेशल लोकल फेर्‍या (Ladies Special Local Trains) चालवल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर महिलांसाठी सहा लेडीज स्पेशल फेर्‍या महिला प्रवाशांसाठी आज बुधवार, 21 ऑक्टोबर पासून धावणार आहेत.

मुंबईमध्ये 15 जून पासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत करण्याला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला महाराष्ट्र राज्य सरकार कडून अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍यांनाच केवळ मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी मुभा होती. त्यासाठी क्युआर कोड देण्यात आले होते. Mumbai Local: मुंंबई लोकलमधून प्रवासाठी सर्वांनाच मिळणार परवानगी! रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात आज पार पडणार बैठक.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लेडीज स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक 

मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे कडून सध्या कोरोना संकट काळामध्ये प्रत्येक दिवशी 704 रेल्वेच्या फेर्‍या चालवल्या जात आहेत. तर मध्य रेल्वे कडून 706 फेर्‍या चालवल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पत्रव्यवहार झाल्यानंतर काल केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आता मुंबई लोकल महिलांसाठी खुली केली आहे. मात्र त्यामध्ये सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटच्या लोकलमध्ये सामान्य महिलांना प्रवास करता येईल. मात्र यादरम्यान मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असेल.