![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/03/Eknath-Shinde-380x214.jpg)
CM Eknath Shinde Receives Journalism Degree: राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा सामना करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून (Yashwantrao Chavan Open University) पत्रकारितेची पदवी (Journalism Degree) 77% गुणांसह पूर्ण केली. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्रविद्या व जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली.
कुलपती डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या मुंबईतील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांना प्रमाणपत्र सुपूर्द केलं. यापूर्वी शिंदे यांनी वायसीएमओयूमधून बीए केले आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी पदवी आणि मानवाधिकार विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचं पुढे काय होणार? कोर्टाचा आजचा निकाल ऐकून तुम्हालाही 'हे' प्रश्न पडले आहेत का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यसह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी कुलगुरू पाटील यांचे समिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील उपस्थित होते. शिंदे यांच्या या यशावर प्रतिक्रिया देताना कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लौकिकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज अवघ्या देशाच्या डोळ्यादेखत महाराष्ट्र सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पूर्णविराम दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली.