![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/Mumbai-Metro.jpg?width=380&height=214)
मुंबई मेट्रो (Mumbai Metro) च्या लाईन 2A आणि 7 अर्थात यलो लाईन आणि रेड लाईन ची सेवा सुरू होऊन 2 वर्ष उलटली आहे. मात्र या मार्गावर प्रवासी संख्या अपेक्षेच्या 33% किंवा 1/3 प्रवासी ती वापरताना दिसत आहे. कडून मंगळवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेट्रोची ही लाईन 18.6 किमी लांब आहे. यावर line 2A ही दहिसर ते डीएन नगर दरम्यान चालवली जाते तर 16.5 किमी वर लाईन 7 कए दहिसर ते अंधेरी पूर्व भागात मेट्रो धावते. 2023 पासून ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. दोन्ही लाईन वर 158 मिलियन प्रवासी आतापर्यंत आले आहेत.
एकूण प्रवाशांमध्ये 55% प्रवाशांनी व्हॉट्सअॅप, मुंबई 1, यात्री वर डिजिटल स्वरूपात तिकीट काढले आहे तर 45% प्रवाशांनी क्यूआर बेस्ड पेपर तिकीट काढले. ऑक्टोबर 2024 मध्ये MMOCL ने WhatsApp तिकीट सुरू केले, तेव्हा QR कोड-आधारित पेपर तिकिटांचा वाटा एकूण तिकीट विक्रीपैकी 62% होता.
MMOCL ने मंगळवारी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे डिजिटल तिकिटाच्याविक्रीमध्ये वाढ झाली म्हणून आनंद साजरा करण्यात आला. दोन मेट्रो मार्गांवर सर्वाधिक दैनंदिन प्रवासी, सुमारे 292,000, गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी नोंदवले गेले आहेत.
MMOCL ने तिकिटासाठी मुंबई 1, हे स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. दरम्यान जेव्हा मेट्रोची तिकिटे भारतीय रेल्वेच्या यात्री ॲपद्वारे देखील खरेदी करता येतात. यात्री ॲपला बराच काळ लोटला असला तरी, विविध शहरांतील मेट्रो सेवांसाठी तिकीट बुक करण्याचा पर्याय डिसेंबर २०२४ मध्येच सुरू करण्यात आला होता, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले आहे.