Chhaava Teaser | Instagram

छावा (Chhaava) हा ऐतिहासिक सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतला आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 दिवशी रिलीज साठी सज्ज आहे. रिलीज आता अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना सोशल मीडीयामध्ये छावा सिनेमाच्या एच डी प्रिंटचे काही शॉर्ट्स सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. या पोस्ट्समध्ये hdhub4u वरून वॉटरमार्क असलेले चित्रपटाचे स्क्रीनशॉट दिसत आहेत, जे सूचित करतात की साइटवर लीक झालेले प्रिंट्स असू शकतात. लीक झालेले शॉट्स हे सेंसॉर कॉपी असू शकते. पण हे लीक झालेले शॉर्ट्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे.

प्रमोशनल मटेरियला वापर करून काही जण खोटसाळपणा देखील करू शकतात. हे फेक स्क्रिनशॉर्ट्स देखील असू शकतात. सध्या या दाव्यांची authenticity तपासली गेलेली नाही.

एका युजरने छावाच्या निर्मात्यांना टॅग करत या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची विनंती केली आहे. युजरने पुढे आरोप केला की टेलिग्राम पेजशी संबंधित एक टीम चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी - 12 फेब्रुवारी रोजी टॉरेंट साइटद्वारे ऑनलाइन प्रदर्शित करण्याची योजना आखत आहे.

 

Post With Screenshot of Alleged Leaked Print of Chhaava
Post With Screenshot of Alleged Leaked Print of Chhaava

दरम्यान हा विरोधी फॅन क्लब कडून प्रॅन्क आहे की खरचं लीक आहे हे निर्मात्यांनी लवकर पाहणं गरजेचे आहे. दोषींविरूद्ध त्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.

Deva, Thandel, Badass Ravi Kumar, आणि Loveyapa यांसारखे चित्रपट पायरसीला बळी पडून भारतीय चित्रपटांच्या एचडी प्रिंट्स त्यांच्या रिलीजच्या तारखांना किंवा त्याच्या काही काळानंतर टोरेंट साइट्सवर वारंवार दिसतात. एचडी प्रिंटची प्री-रिलीझ लीक हा एक अत्यंत आणि निंदनीय उल्लंघन आहे, जो चित्रपट पायरसीच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकतो.