Women Entrepreneurs | * images used are for representation purposes only | Pixabay.com

'बॉबकार्ड' महिला उद्योजकांना 'जीवनाची पुनर्कल्पना करणे: शक्ती समृद्धी' या संकल्पनेतून सामर्थ्य देत आहे.  बॉबकार्ड लिमिटेड हीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि तिने "जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी" कार्यक्रमाचे अनावरण केले. हा उपक्रम बॉबकार्डच्या प्रमुख (फ्लॅगशिप) सीएसआर व्हिजन, "जीवनाची पुनर्कल्पना करणे" चा पाया आहे आणि याने कायमस्वरूपी समुदायांना प्रभावित करण्याचे समर्पण स्वीकारले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 100+ महिला उद्योजकांना सामर्थ्य देण्याचे उद्दिष्ट आहे आणि या वर्षभर आणि त्यापुढील काळात हे कौशल्य विकास, वित्तीय साक्षरता प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन हे साध्य केले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्या श्रीमती अदिती तटकरे माननीय महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित होते. युनायटेड वे मुंबई (यूडब्ल्यूएम) सोबत सहयोग साधून शिलाई मशीन, बेकिंग उपकरणे आणि इतर आवश्यक साधनांसह उद्योजकता किट वितरित करण्याचा बॉबकार्डचा पुढाकार आहे आणि त्यायोगे लाभार्थ्यांना त्यांचे व्यवसाय तयार करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी सुसज्ज करत आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई एकत्रितपणे अशी एक सर्वसमावेशक समर्थन प्रणाली तयार करण्यासाठी काम करीत आहेत जी उद्योजकक्षेत्रातील महिलांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करणार आहे. मध्य भारतात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची तयारी छोट्या शहरांमधील महिला उद्योजिकांनी केलेली आहे. शिक्षण आणि धोरणात्मक सुधारणांमध्ये प्रगती झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली आहे, तरी सुद्धा उद्योजकतेत यांची कमी प्रमाणात उपस्थिती दिसून येते. अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी त्वरित लक्ष केंद्रित करणे आणि लक्ष्यित प्रयत्नांची आवश्यकता असलेली एक गंभीर दरी या विषमतेने स्पष्ट केलेली आहे.