Mumbai Walkathon

मुंबईमध्ये येत्या 16 मार्च रोजी एक अभिनव उपक्रम पहिला ‘मुंबई वॉकथॉन 2025’ होणार आहे. मुंबईकरांच्या धावपळीच्या जीवनात, फिटनेस आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढणे खूप आव्हानात्मक असू शकते. या पार्श्वभूमीवर चालण्याचे महत्व अधोरेखित करत, मुंबईमध्ये #JustWalkIndia वॉकथॉन आयोजित केला आहे. हा वॉकथॉन मुंबईतील जुहू परिसरात पार पडणार आहे. 26Ideas या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश चालण्याच्या साध्या क्रियेद्वारे आरोग्य, आनंद आणि एकतेचा उत्सव साजरा करणे आहे. स्पर्धक कॅज्युअल किंवा पारंपारिक पोशाखात या वॉकथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. हा वॉकथॉन केवळ एक कार्यक्रम नाही तर, तो आरोग्य, आनंद आणि समावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या देशव्यापी चळवळीचा एक भाग असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

वॉकथॉनसाठी तीन वेगवेगळे मार्ग/श्रेणी असतील- 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी चालणे. या वॉकथॉनसाठी तीनही प्रकारांमध्ये वेगवेगळे नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. सहभागींना तीन वेगवेगळ्या वॉकपैकी एका वॉकमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. (हेही वाचा: Indians' Food Habits: 'वाईट अन्न' हे भारतातील 56% आजारांचे कारण; खाऊ नयेत अशा पदार्थांचे सेवन करत आहेत देशातील लोक, AIIMS ने व्यक्त केली चिंता)

शुल्क-

3 किमी फॅमिली वॉक- 799 रुपये

यात टी-शर्ट, अल्पोपहार, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि नंबर समाविष्ट आहे.

5 किमी फन वॉक- 899 रुपये

यात नंबर, अल्पोपहार, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि टी-शर्ट समाविष्ट आहे.

10 किमी प्रो वॉक- 999 रुपये

यामध्ये नंबर, अल्पोपहार, डिजिटल प्रमाणपत्र, पदक आणि टी-शर्ट समाविष्ट आहे.

नोंदणी-

या वॉकथॉनसाठी तुम्ही 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी www.justwalkindia.com वर नोंदणी करून शकाल. मात्र वॉकिंग बिब्स स्लॉट भरल्यानंतर यामध्ये सहभागी होता येणार नाही.

कार्यक्रमाची सुरुवात जमनाबाई नरसी शाळेच्या मैदानावरून होईल आणि सहभागी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळून जुहू बीचकडे जाऊन परत येतील. या कार्यक्रमाचे नेतृत्व जुहूचे रहिवासी, आयर्नमॅन ट्रायथलीट आणि गिनीज रेकॉर्डधारक कपिल अरोरा करतील, जे चीफ वॉकर म्हणून काम करतील.