नवी मुंबई मध्ये पाईप लाईन फुटल्याने आज खारघर, कामोठे, बेलापूर भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या सोशल मीडीयात पाईप लाईन फूटल्यानंतरचे व्हिडिओ वायरल झाले आहेत.कळंबोली मध्ये मार्बल मार्केट मधील व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यामध्ये मोर्बे डॅम च्या 2042 mm पाईपलाईनला फटका बसल्यास दिसत आहे. रिपोर्ट्स नुसार तातडीच्या कामासाठी भोकरपाडा वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद करण्यात आला आहे. गुरूवारी 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. यावेळी पाण्याचा दाब कमी राहील अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईकरांना पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई मध्ये पाईपलाईन फूटली
navi mumbai: The main water supply pipeline of the municipal corporation burst in Navi Mumbai pic.twitter.com/eSt9RuMpKR
— Siraj Noorani (@sirajnoorani) February 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)