![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/team-india-2025-02-12t201901-125.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd ODI 2025) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला गेला. तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. तत्तपुर्वी, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 214 धावांवर गारद झाला.
3RD ODI. India Won by 142 Run(s) https://t.co/RDhJXhBfQl #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 12, 2025
शुभमन गिलने झळकावले शानदार शतक
नाणेफेक गमावल्यानंतर भारताने निर्धारित 50 षटकांत 356 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. सलामीवीर शुभमन गिलने त्याचे सातवे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. विराट कोहली (52) आणि श्रेयस अय्यर (78) यांनी अर्धशतके झळकावली. गिलने कोहलीसोबत 116 धावांची आणि अय्यरसोबत 104 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, इंग्लंडकडून स्टार गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. आदिल रशीद व्यतिरिक्त मार्क वूडने दोन विकेट घेतल्या.
हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहलीची मोठी कामगिरी; इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
प्रत्युत्तरात, इंग्लंड संघाला 34.2 षटकांत 10 गडी गमावून केवळ 214 धावा करता आल्या. इंग्लंडंकडून टॉम बँटन 38 आणि गस अॅटकिन्सन 38 सर्वाधिक धावा करुन शकले. त्यासह इंग्लिश फलंदाज फ्लाॅप ठरले. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.