Virat Kohli Record: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli ) इतिहास रचला. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या 87 व्या सामन्यात विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) -63 डावात 5028

अ‍ॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) - 124 डावात 4850

स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 114 डावात 4815

व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) - 84 डावात 4488

रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 99 डावात 4141

विराट कोहली (भारत) - 109 डावांमध्ये 4001

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डॉन ब्रॅडमन हा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहेत. त्याने 37 कसोटी सामन्यांमध्ये 5028 धावा करून या यादीत अव्वल स्थानावर आहे.

इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)