Eating Less at Night Benefits: चांगल्या आरोग्यासाठी रात्रीचे जेवण दिवसातील सर्वात हलके जेवण असावे. बरेच लोक रात्रीचे जेवण रात्री 9 वाजता किंवा त्यानंतरही करतात. भूक आणि वजन वाढण्यामागील लेप्टिन (उपासमार संप्रेरक) आणि घ्रेलिन हे दोन प्रमुख हार्मोन्स शरीरात कार्य करतात. तज्ञ ांनी स्पष्ट केले की, शरीरात दोन हार्मोन्स आहेत जे आपली भूक वाढवतात किंवा नियंत्रित करतात. लेप्टिन शरीरातील चरबीच्या पेशींद्वारे तयार केले जाते आणि मेंदूला सूचित करते की, शरीराला अन्नाची आवश्यकता नाही. दुसरीकडे, घ्रेलिन हा भूक वाढवणारा घटक आहे जो पोटात तयार होतो आणि मेंदूला अधिक खाण्याचे संकेत पाठवतो. खाण्यापूर्वी घ्रेलिनची पातळी वाढते आणि खाल्ल्यानंतर कमी होते, ज्यामुळे दर चार तासांनी भूक लागणे स्वाभाविक असते. रात्री काहीही न खाल्यामुळे सकाळी घ्रेलिनची पातळी सर्वाधिक असते. झोपण्यापूर्वी प्रक्रिया केलेले, साखरयुक्त पदार्थ खाणे टाळल्यास झोप चांगली लागेल आणि सकाळी तुमचा मूड एकदम आनंदी राहील. रात्री मिठाई, मैदा आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्यास त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोट फुगते, हे संपूर्ण
उत्तर प्रदेशातील हरदोई येथे शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र चालवणारे डॉ. अमित कुमार हेल्दी डाएटचा सल्ला देतात. ते म्हणतात की, "रात्री हलका आणि पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे. वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रात्रीच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण वाढविणे. चिकन, मासे यासारखे अन्न तसेच प्रथिने आणि फायबरयुक्त भाज्या खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनची पातळी स्थिर राहते. दुसरीकडे, उच्च चरबीयुक्त आणि उच्च कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ रक्तातील साखर आणि मधुमेहाची पातळी असंतुलित करू शकतात, ज्यामुळे रात्री अधिक भूक लागू शकते.
आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, रात्री हलके आणि योग्य जेवण केल्याने वजन नियंत्रित होण्यास मदत होतेच शिवाय हृदयरोग, मधुमेह आणि इतर आजारांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे पुढच्या वेळी रात्री भूक लागल्यास हेल्दी पर्याय निवडा आणि निरोगी रहा.