Wildlife DNA Testing Lab: महाराष्ट्रातील पहिला वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपूर येथे सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्रातील पहिला वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपूर येथे सुरु. | (Photo Credit: Twittter)

वन्यजीवांच्या डीएनए चाचणीसाठी महाराष्ट्राचे इतर हैदराबाद (Hyderabad) आणि देहरादून (Dehradun) वरील अवलंबीत्व संपुष्टात येऊन राज्य स्वावलंबी झाले आहे. नागपूर येथे वन्यजीव डीएनए विश्लेषण (Wildlife DNA Testing Lab) विभाग सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यासोबतच निर्भया योजनेंतर्गत, तपासकार्य वेगाने होण्यास मदत करणाऱ्या ३ फास्ट ट्रॅक मानवी DNA चाचणी युनिटचाही ऑनलाईन शुभारंभ केला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नुकतीच व्याघ्र संवर्धन नियामक मंडळ बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वन्यजीवांसह जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्याचे, निर्देश दिले. (हेही वाचा, Black Panther In Mahabaleshwar: महाबळेश्वरमधील प्रसिद्ध प्रतापगड किल्ल्याजवळ घडले दुर्मीळ ब्लॅक पँथरचे दर्शन )

महाराष्ट्रात पाठीमागील काही महिन्यांपासून वाघ आणि बिबट्या यांसह इतरही काही वन्यजीवांच्या शिकारीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. या प्रकरणांच्या मुळाशी न जाता आल्याने गुन्हेगारांना आळा घालण्यात वनखात्याला यश येत नव्हते. तसेच, तपास करण्यासाठी वन्यप्राण्याच्या डीएनए चाचणीसाठी महाराष्ट्र हैदराबाद आणि देहरादून येथली प्रयोगशाळेवर अवलंबून होता. मात्र, आता राज्य सरकारनेच नागपूर येथे स्वत:ची वन्यजीव डीएनए प्रयोगशाळा सुरु केली. त्यामुळे महाराष्ट्र या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. राज्यातील ही पहिलीच वन्यजीव प्रयोगशाळा आहे.

ट्विट

महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी पाच प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. शिवाय इतरही अनेक अभयअरण्ये आहेत. त्यामुळे सहाजिकच वाघाचेही प्रमाणही इथे आहे. त्यामुळे या परिसरात वाघाची आणि इतर वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. आतापर्यंत वन्यजीवांची हत्या अथवा शिकार केल्याने होणारे गुन्हे डीएनए चाचणी होत नसल्याने उघडकीस येत नव्हते किंवा त्याचा तपास करण्यावर मर्यादा येत होत्या. शिवाय इतर राज्यातील प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे विशेषण येण्यास जवळपास वर्ष वर्ष लागत असे. यात ते नमुने खराबही होण्याची शक्यता वाढत होती. मात्र, आता या तपासास वेग येणार आहे.